ST Mahamandal Portal

MSRTC Login - एसटी महामंडळ लॉगिन पद्धत


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पोर्टल वर तिकीट आरक्षण करणे, तिकीट रद्द करणे, नवीन बस पास काढणे तसेच NCMC कार्ड रिचार्ज करणे यासाठी पोर्टल वर लॉगिन करणे आवश्यक असते. त्यामुळे MSRTC Portal वर लॉगिन (MSRTC Login) कसे करावे याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.


पहिला टप्पा:

  • प्रवाशांना सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पोर्टल वर जावे लागेल.
  • होम पेज वर गेल्यावर ऑनलाईन बुकिंग ई तिकीट आरक्षित करणे यावर क्लिक करावे लागेल.

  • msrtc home page

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला Login या बटनावर क्लिक करावे लागेल.

  • msrtc login button

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा Username आणि Password टाकावा लागेल आणि Login बटनावर क्लिक करावे लागेल.

  • msrtc registor button

  • अशा प्रकारे तुमची Login प्रक्रिया पूर्ण होईल.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) च्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून प्रवाशांना अनेक फायदे मिळतात. यामधील मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत:


  1. ऑनलाईन तिकीट आरक्षण: प्रवासी घरबसल्या त्यांच्यासाठी ऑनलाईन तिकीट बुक करू शकतात. त्यामुळे बसस्थानकावर जाऊन तासनतास रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचतो.
  2. सवलतींचा लाभ: एसटी महामंडळामार्फत प्रवाशांसाठी विविध सवलती दिल्या जातात. पोर्टलवर नोंदणी करून तुम्ही विविध सवलतींचा लाभ मिळवू शकता.
    • महिला सन्मान योजना: तिकीट दरात ५०% सवलत.
    • जेष्ठ नागरिक सवलत: ६५ ते ७५ वयोगटातील नागरिकांना ५०% आणि ७५ वर्षांवरील (अमृत ज्येष्ठ नागरिक) प्रवाशांना १००% मोफत प्रवास
    • विद्यार्थी सवलत: शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात ऑनलाईन पास मिळवता येतो. ज्यामुळे बस स्थानकावर जाऊन रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचतो.
  3. तिकीट इतिहास किंवा तिकीट रद्द सुविधा:
    • काही कारणास्तव जर तुम्हाला तुमची तिकीट रद्द करायची असेल तर घरबसल्या पोर्टल वर जाऊन तिकीट रद्द करून तुमच्या तिकिटाचा परतावा मिळवू शकता.
    • तुम्ही तुमचे जुने तिकीट कधीही पाहू शकता किंवा डाऊनलोड करू शकता.
  4. सुरक्षित पेमेंट आणि ई-वॉलेट:
    • तुम्ही पोर्टल वर नोंदणी करून लॉगिन करून तुमचे पेमेंट तपशील किंवा ई-वॉलेट वापरून जलद गतीने ऑनलाईन तिकीट आरक्षण करू शकता. यामुळे तिकीट बुक करताना वारंवार स्वतःची माहिती तसेच बँक डिटेल्स भरण्याची गरज भासत नाही.
  5. बस वेळापत्रक सूचना
    • बसचे अचूक वेळापत्रक, बस चा मार्ग मार्ग तसेच बसचा प्रकार (उदा. शिवनेरी, अश्वमेध, हिरकणी, साधी बस) यांची अचूक माहिती मिळवू शकता.
    • बस सुटण्याच्या अगोदर बस ची वेळ किंवा प्रवासात काही बदल झाल्यास एसएमएस द्वारे सूचना मिळते.
  6. स्मार्ट कार्ड लिंक करण्याची सुविधा: तुमच्याकडे एसटीचे स्मार्ट कार्ड असेल (NCMC Card) तर त्यातील शिल्लक रक्कम तपासणे किंवा कार्ड रिचार्ज करणे सोपे जाते.

टीप: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत पोर्टल वर लॉगिन करून वरील प्रमाणे अनेक गोष्टी करता येतात. त्यामुळे स्वतःचा Username आणि Password लक्षात ठेवा. किंवा तुमच्या डायरीत लिहून ठेवा. जेणेकरून Username आणि Password विसरल्यास अडचणींचा सामना करावा लागणार नाही.




© 2026 All Rights Reserved