ST Mahamandal Portal

MSRTC Password Change - एसटी महामंडळ पोर्टल पासवर्ड बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पोर्टल वरील स्वतःची माहिती सुरक्षित ठेवणे गरजेचे असते त्यासाठी वेळोवेळी पासवर्ड बदलणे अत्यंत आवश्यक असते. जर तुम्ही तुमचा जुना पासवर्ड विसरला असाल अथवा सुरक्षेच्या कारणास्तव तो बदलू इच्छित असाल तर पासवर्ड बदलण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. आजच्या या लेखात आपण राज्य परिवहन महामंडळाच्या पोर्टलवर पासवर्ड कसा बदलायचा याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.


पहिला टप्पा:

  • प्रवाशांना सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पोर्टल वर जावे लागेल.
  • होम पेज वर गेल्यावर ऑनलाईन बुकिंग ई तिकीट आरक्षित करणे यावर क्लिक करावे लागेल.

  • msrtc home page

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला Login या बटनावर क्लिक करावे लागेल.

  • msrtc login button

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा Username आणि Password टाकून Login बटन वर क्लिक करावे लागेल.

  • login page of msrtc portal
  • आता तुमची लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.

दुसरा टप्पा:

  • लॉगिन केल्यावर तुमच्या समोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये उजव्या बाजूला Welcome बटनावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर Drop Down Menu ओपन होईल. (Profile, Change Password, Passenger Master List, Logout) त्यामध्ये Change Password पर्यायावर क्लिक करा.

  • msrtc portal change password option
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही तुमचा Old Password टाकून New Password / Re-Enter New Password टाकून Change बटन वर क्लिक करा.
  • msrtc change password page
  • अशा प्रकारे तुमचा Password Change होईल.

सुरक्षित पासवर्डसाठी काही महत्वाच्या गोष्टी:

  • पासवर्ड किमान ८ ते १२ अक्षरांचा असावा.
  • पासवर्डमध्ये अक्षरे (A-Z), अंक (0-9) आणि चिन्हे (@, #, $, %) यांचा वापर करा.
  • आपला पासवर्ड कधीही कोणासोबत शेअर करू नका आणि सार्वजनिक ठिकाणच्या संगणकावर पासवर्ड टाकल्यावर 'Remember Password' करू नका.



© 2026 All Rights Reserved