ST Mahamandal Portal

MSRTC Password Reset - एसटी महामंडळ पोर्टल पासवर्ड विसरलात? काळजी करू नका, असा करा रिसेट!


एसटी महामंडळाच्या अधिकृत पोर्टलवर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुकिंग, तिकीट रद्द करणे, नवीन बस पास काढणे किंवा त्याचे नूतनीकरण करणे यांसारख्या अनेक महत्वाच्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. इतकेच नाही तर नवीन NCMC कार्ड काढणे आणि ते रिचार्ज करणेही आता सोपे झाले आहे. मात्र या सर्व सेवांसाठी तुम्हाला राज्य परिवहन महामंडळाच्या पोर्टल वर 'लॉगिन' करणे अनिवार्य आहे. परंतु जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरलात तर या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अडथळा येऊ शकतो. म्हणूनच तुम्ही जर तुमचा पासवर्ड विसरलात तर तो कसा रिसेट करायचा याची सविस्तर माहिती आम्ही खाली दिलेली आहे.


पहिला टप्पा:

  • प्रवाशांना सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पोर्टल वर जावे लागेल.
  • होम पेज वर गेल्यावर ऑनलाईन बुकिंग ई तिकीट आरक्षित करणे यावर क्लिक करावे लागेल.

  • msrtc home page

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला Login या बटनावर क्लिक करावे लागेल.

  • msrtc login button

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला Forgot Password? वर क्लिक करायचे आहे.

  • msrtc forgot password option

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा नोंदणीकृत ई-मेल आयडी टाकावा लागेल. आणि Proceed बटनावर क्लिक करावे लागेल.


  • आता तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी वर राज्य परिवहन मंडळाचा मेल आला असेल त्यामध्ये तुम्हाला लॉगिन करण्यासाठी तात्पुरता पासवर्ड दिला जाईल.

  • msrtc sent password to email notification
    msrtc sent password to email

  • आता तुम्हाला पुन्हा लॉगिन बटन वर क्लिक करावे लागेल.

  • press msrtc login button

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा username आणि पासवर्ड टाकावा लागेल. (पासवर्ड मध्ये तुम्हाला तुमच्या ई-मेल वर जो तात्पुरता पासवर्ड आला आहे तो टाकावा लागेल.) आणि Login बटन वर क्लिक करायचे आहे.

  • login page of msrtc portal

  • अशा प्रकारे तुम्ही जर तुमचा पासवर विसरल्यास पासवर्ड रिसेट करून लॉगिंन करू शकता.




© 2026 All Rights Reserved