MSRTC VTS Registration - आता बस करा Online Track
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी VTS (Vehicle Tracking System)
म्हणजेच 'वाहन ट्रॅकिंग प्रणाली' सुरु केली आहे. या प्रणालीमुळे एसटी बसचे रिअल-टाइम लोकेशन म्हणजेच एसटी सध्या कोठे आहे
हे ट्रॅक करणे शक्य झाले आहे.
VTS म्हणजे काय?
VTS हे बसमध्ये बसवलेल्या GPS उपकरणाच्या सहाय्याने काम करते. याद्वारे बस सध्या कुठे आहे बसचा वेग किती आहे आणि ती बस
पुढच्या थांब्यावर किती वेळात पोहोचेल याची अचूक माहिती नियंत्रण कक्षाला आणि प्रवाशांना मिळते.
VTS चा प्रवाशांना होणारा फायदा
- रिअल-टाइम लोकेशन: बस सध्या कुठे आहे हे प्रवासी घरबसल्या स्वतःच्या मोबाईल च्या सहाय्याने पाहू शकतात.
- अपेक्षित वेळ: बस तुमच्या थांब्यावर अंदाजे किती वाजता येईल याची माहिती मिळते. त्यामुळे प्रवाशांना तासनतास बसची वाट पाहत ऊन, पावसात उभे राहण्याची गरज भासत नाही.
- नियोजन: जर बस थांब्यावर उशिरा येणार असेल तर प्रवासी त्याप्रमाणे आपल्या प्रवासाचे नियोजन करू शकतात.
प्रवासी दोन प्रकारे msrtc vts माहिती मिळवू शकतात:
- MSRTC Mobile App: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत 'MSRTC Mobile Reservation' किंवा 'MSRTC VTS' ॲप च्या सहाय्याने बस चे नाव, बस चा क्रमांक किंवा मार्गाचे नाव टाकून बस सध्या कोठे आहे याची अचूक माहिती घेता येते.
- अधिकृत वेबसाईट: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत पोर्टल वर काही मार्गांसाठी ट्रॅकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
MSRTC VTS चा महामंडळासाठी व प्रवाशांना होणारा फायदा:
- वेग नियंत्रण: बस ठराविक वेगापेक्षा जास्त वेगाने चालवली जात असल्यास नियंत्रण कक्षाला लगेच अलर्ट मिळतो. ज्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
- मार्ग तपासणी: बस ठरवून दिलेल्या मार्गावरूनच जात आहे की नाही यावर लक्ष ठेवता येते. त्यामुळे जर ड्रायव्हरने ठरलेला मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने बस नेली, तर कंट्रोल रूमला लगेच 'अलर्ट' जातो.
- अनधिकृत थांबे: जर बस विनाकारण एखाद्या ठिकाणी जास्त वेळ थांबली तर त्याची नोंद होते. यामुळे प्रवासाचा वेळ वाचवण्यास मदत होते.
- प्रवाशांची सुरक्षा: आपत्कालीन परिस्थितीत बसचे नेमके लोकेशन माहिती असल्याने मदत लवकर पोहोचवता येते.
- बसचा अपघात किंवा बिघाड: बस रस्त्यात बंद पडली अथवा तिचा अपघात झाला तर तिचे अचूक लोकेशन माहिती असल्याने मदतीला त्वरित दुसरी बस पाठवणे सोपे जाते.
- इंधनाची बचत: बसचे अनावश्य थांबणे किंवा इंजिन चालू ठेवणे यावर नियंत्रण मिळवून इंधनाची बचत केली जाते.
- बस चा शोध: जर तुम्हाला मुंबई वरून चिपळूण ला जायचे असेल तर तुम्ही ॲपमध्ये मुंबई ते चिपळूण मार्ग टाकला की त्या मार्गावर सध्या किती बसेस धावत आहेत आणि त्यांचे लोकेशन काय आहे हे नकाशावर दिसते.
- नजीकचा थांबा: तुमच्या नजीकच्या बस स्थानकावर पुढील ३० मिनिटांत किंवा १ तासात कोणती बस येणार आहे याची यादी पाहता येते.
राज्य परिवहन महामंडळाच्या खालील बसेस मध्ये VTS प्रणाली कार्यरत आहे.
- शिवशाही
- शिवनेरी
- सेमी लक्झरी
- साधी बस
- लांब पल्ल्याच्या बसेस
MSRTC VTS ही यंत्रणा कशी काम करते
- प्रत्येक बसमध्ये एक GPS आणि SIM Card बसवलेले असते.
- हे युनिट उपग्रहाकडून बस चे Location मिळवते.
- ही माहिती सिम कार्डद्वारे मुख्य सर्व्हरला पाठवली जाते.
- सर्व्हर मिळालेल्या माहितीच्या आधारे ॲपवर किंवा बस स्थानकावरील डिजिटल बोर्डवर बस चे लोकेशन दाखवतो.
VTS च्या वापरावर तांत्रिक त्रुटी आणि मर्यादा
कधीकधी खराब नेटवर्क किंवा GPS उपकरणात बिघाड झाल्याने बसचे लोकेशन अपडेट होण्यास उशीर होऊ शकतो किंवा बस 'Not Available' दाखवू शकते.
MSRTC VTS Registraiton
MSRTC VTS प्रणालीचा वापर करण्यासाठी प्रवाशांना MSRTC VTS App वर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे MSRTC VTS
App वर स्वतःची नोंदणी कशी करावी याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
- प्रवाशांना Google Play Store वर MSRTC VTS App सर्च करून Download करा आणि त्यानंतर Install करा.
- अँप Opne केल्यावर तुम्हाला तुमचे नवीन खाते तयार करावे लागेल त्यासाठी Sign Up/Register बटणावर क्लिक करा.
- आता तुमचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका.
- तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो प्रविष्ट करा.
- एक पासवर्ड तयार करा. अशा प्रकारे तुमची नोंदणी पूर्ण होईल.
बस ट्रॅक कशी करायची?
एकदा लॉगिन झाल्यावर बस ट्रॅक कशी करायची याची संपूर्ण पद्धत खाली दिलेली आहे.
- 'Track Bus' या पर्यायावर क्लिक करा.
- Search by Bus Number: जर तुमच्याकडे बसचा नंबर (उदा. MH 14 BT 1234) असेल, तर तो टाकून तुम्ही थेट त्या बसचे लोकेशन पाहू शकता.
- Search by Route: जर तुमच्याकडे नंबर नसेल, तर From आणि To मध्ये बस स्थानकांची निवड करा. त्या मार्गावर धावणाऱ्या सर्व बसेसची यादी तुमच्या स्क्रीन वर दिसेल.
- त्यापैकी तुमच्या बसवर क्लिक केल्यास नकाशावर त्या बस चे Live Location दिसेल.
बस स्थानकावरील QR Code चा वापर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अनेक बस स्थानकांवर QR Code लावलेले आहेत. तुमच्या मोबाईलमधील स्कॅनरने तो
कोड स्कॅन केल्यास त्या स्थानकावर येणाऱ्या सर्व एसटी बसेसची Real Time माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीन वर
पहायला मिळेल.
महत्त्वाच्या टिप्स:
- ॲप वापरताना तुमच्या मोबाईलचे GPS सुरू ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जवळील बस स्थानक शोधणे सोपे जाईल.
- सदर प्रणाली पूर्णपणे इंटरनेटवर चालते त्यामुळे Internet Connection सुरू असल्याची खात्री करा.
- तुम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन 'Bus Tracking' वर क्लिक करून बस चे Live Location पाहू शकता.