एस टी महामंडळ पोर्टल

Shivneri Bus Timing - वातानुकूलित शिवनेरी बस सेवा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक बस स्थानकातून सुटणाऱ्या शिवनेरी बस वेळापत्रकाची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. यामध्ये बस मार्ग तसेच दैनंदिन फेऱ्यांची संख्या यांचा समावेश केलेला आहे.


shivneri bus


वातानुकूलित शिवनेरी बस सेवा


दादर-पुणे-दादर मार्गावर महामंडळांची वाहतूक सेवा सन 1981 पासून चालू आहे. जसजशी ही वाहतूक लोकप्रिय होत गेली तसतसे या मार्गावर फेऱ्या वाढविण्यात आल्या.


दिनांक 28.12.2002 पासून दादर - पुणे रेल्वे स्टेशन या मार्गावर 5 वातानूकूलित अश्वमेध बसेसची वाहतूक चालू करण्यात आलेली असून प्रत्येक बसच्या प्रत्येकी दोन परतीच्या फेर्‍या चालू करण्यात आल्या. या व्होल्वो बस वाहतूकीस प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सदर मार्गावर आणखी नवीन वातानूकुलीत बसेस चालनात आणण्यात आल्या आहेत, तसेच दादर - स्वारगेट, ठाणे - स्वारगेट, बोरीवली-सायन-स्वारगेट, नाशिक-पुणे, औरंगाबाद-पुणे, सांगली-पुणे रेल्वे स्टेशन, कोल्हापूर-पुणे रेल्वे स्टेशन व इ. मार्गावर वातानुकूलीत बसेस प्रवाश्यांची निकड पाहून चालनात आणण्यात आल्या आहेत.


Shivneri buses

विभाग मार्ग दैनंदिन फेऱ्यांची संख्या
मुंबई दादर (मुंबई) - पुणे रेल्वे स्टेशन (औंध) 20
दादर - मुंबई - पुणे रेल्वे स्टेशन (चिंचवड) 36
दादर - स्वारगेट (पुणे) 36
ठाणे ठाणे - पुणे (स्वारगेट) 36
बोरीवली - स्वारगेट 24
ठाणे - पुणे (रेल्वे स्टेशन) 6
पुणे पुणे रेल्वे स्टेशन - दादर (मुंबई) 86
पुणे (शिवाजीनगर) - नाशिक 22
पुणे (स्वारगेट) - ठाणे 40
पुणे (स्वारगेट) - बोरीवली (मुंबई) 34
पुणे (शिवाजीनगर) - छत्रपती संभाजीनगर 12
स्वारगेट - दादर (मुंबई) 40
पुणे शिवाजीनगर नाशिक (जनशिवनेरी) 22
पुणे रेल्वे स्टेशन - कोल्हापूर 6
छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर - पुणे - शिवाजीनगर 2
नाशिक नाशिक - पुणे (जनशिवनेरी) 22



© 2026 All Rights Reserved