एस टी महामंडळ पोर्टल

एसटी बस सवलत योजना - ST Bus Concession

राज्यातील जेष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, स्वातंत्र सैनिक व त्याचे एक साथीदार, ४० % अथवा त्यापेक्षा अधिक अंध व अंपग व्यक्ती, ६५ % अथवा त्यापेक्षा अधिक टक्केवारी असलेल्या अंध व अंपग व्यक्ती यांचे मदतनीस तसेच इतर नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या एसटी बसेस च्या प्रवासी भाडयात पुढील प्रमाणे सवलती देण्यात येत आहेत.


बस दरातील सवलती

सवलतींचा तपशील सवलत अनुज्ञेय बससेवा प्रकार प्रवासभाडयातील सवलत टक्केवारी
स्वातंत्र सैनिक व त्याचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम 100%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम 100%
अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इ. 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्दयार्थीनीसाठी साधी 100%
शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार-शिवशाही (शयनयान) बस 800 कि.मी.पर्यंत साधी, निमआराम, शिवशाही ( आसनी), शिवशाही (शयनयान) 100%
राज्यातील 65 वर्षावरील ते 75 वर्षापर्यंतचे जेष्ठ नागरिक सर्व प्रकारच्या बसेस
राज्यातील 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिक (अमृत ज्येष्ठ नागरिक) सर्व प्रकारच्या बसेस 100%
विद्यार्थी मासिक पास सवलत - शैक्षणिक / तांत्रिक साधी 66.67%
विद्यार्थ्यांना विशेष बस सेवेद्वारे देण्यात येणारी सवलत साधी 50%
विद्यार्थ्यांना मोठया सुटृीत मुळ गावी येणे जाणे, परिक्षेला जाणे, शैक्षणिक कॅम्पला जाणे, आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्या/येण्या साठीची सवलत साधी 50%
40% अथवा त्यापेक्षा अधिक अंध व अंपग व्यक्ती साधी, निमआराम,
शिवशाही आसनी
75%
70%
65% अथवा त्यापेक्षा अधिक टक्केवारी असलेल्या अंध व अंपग व्यक्ती यांचे मदतनीस साधी, निमआराम
शिवशाही आसनी
50%
45%
क्षय रोगी वैदयकीय उपचारासाठी साधी 75%
कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठी साधी 75%
कुष्ठ रोगी वैदयकीय उपचारासाठी साधी 75%
राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी साधी 33.33%
विद्यार्थी जेवणाचे डबे साधी 100%
अर्जुन, द्रोणाचार्य, पुरस्कार प्राप्त खेळाडू साधी, निमआराम, वातानुकुलित 100%
दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू साधी, निमआराम 100%
आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम 100%
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम 100%
पंढरपूर आषाढी/कार्तिकी एकादशीला शासकीय पुजेचे मान मिळांलेल्या एका वारकरी दाम्पत्यास फक्त एका वर्षासाठी मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम 100%
विद्यमान विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत सर्व प्रकारच्या बसेस 100%
माजी विधान मंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत सर्व प्रकारच्या बसेस 100%
रेसक्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहलीकरिता साधी 66.67%
मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिक दृष्टया अपंग विद्दयार्थ्यांच्या सहलीसाठी साधी 66.67%
अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ति व त्यांचे एक साथीदार साधी, निमआराम 100%
सिकलसेल रुग्ण साधी 100%
दुर्घर आजार (HIV)रुग्ण साधी 100%
डायलेसिस रुग्ण साधी 100%
हिमोफेलिया रुग्ण साधी 100%
राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्ती साधी, निमआराम 100%
कौशल्य सेतू अभियान योजने अंतर्गत लाभार्थी 6 महिने पर्यंत कालावधी असणाऱ्या अभ्यासक्रमा करिता साधी 66.67%
शैक्षणिक खेळ साधी 50%
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना सर्व प्रकारच्या बसेस 100%
महिला सन्मान योजना सर्व प्रकारच्या बसेस 50%
पोलीस/ जेल मोटर वॉरंट साधी , निमआराम 100%

सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी स्वतःजवळ खालील कागदपत्रे ठेवणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड (वयाचा आणि ओळखीचा पुरावा)
  • जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र (जेष्ठ नागरिकांसाठी)
  • स्मार्ट कार्ड (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून दिले जाणारे अधिकृत कार्ड)
  • शाळेचे/कॉलेजचे बोनाफाईड सर्टिफिकेट (शैक्षणिक संबंधी सवलती साठी)
  • अपंगत्वाचे प्रमाणपत्र (वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले)
  • वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र (क्षय रोगी, कुष्ठ रोगी, कर्क रोगी, रुग्ण इत्यादी)

एसटी प्रवास सवलत मिळवण्याची प्रक्रिया

प्रवाशांनी वरील सवलती मिळवण्यासाठी आपल्या नजीकच्या एसटी बस स्थानकात, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत पोर्टल वर किंवा बस कंडक्टरकडे योग्य कागदपत्रांसोबत संपर्क साधावा.


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न: महिला सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे कोणते ओळखपत्र आवश्यक आहे?
उत्तर: महिला सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना कुठल्याही कागदपत्रांची किंवा ओळखपत्राची आवश्यकता नाही.


प्रश्न: 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना शिवनेरी बसमध्ये मोफत प्रवास करता येतो का?
उत्तर: नाही. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या 'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजनेअंतर्गत 75 वर्षांवरील नागरिकांना लाल परी, निमआराम आणि शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा आहे.


प्रश्न: 65 ते 75 वयोगटातील तसेच 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.?
उत्तर: वरील वयोगटातील जेष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी प्रवासादरम्यान शासनाने दिलेले जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड असणे आवश्यक आहे.


प्रश्न: वरील सवलती महाराष्ट्रा बाहेरील प्रवासासाठी लागू आहे का?
उत्तर: ही सवलत फक्त महाराष्ट्र राज्यातील प्रवासासाठी लागू आहे. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील प्रवासासाठी सदर सवलतींचा लाभ दिला जात नाही.


प्रश्न: 65 ते 75 वर्ष वयोगटातील जेष्ठ नागरिकांना बस प्रवासात किती सवलत मिळते?
उत्तर: 65 ते 75 वर्ष वयोगटातील जेष्ठ नागरिकांना बस प्रवासात 50 टक्के सवलत मिळते.



© 2025 All Rights Reserved