महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात १७ हजार ७४२ चालक व वाहक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार
असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ही भरती एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या ८
हजार ३०० नव्या बसेससाठी करण्यात येणार आहे. नव्या बसेसची खरेदी केल्यानंतर त्या चालवण्यासाठी आणि चालक व वाचकांची गरज
आहे. त्यामुळे तातडीने कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी महामंडळात सध्या चालक व
वाहकांच्या पदांवर मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. त्यामुळे प्रवासी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील वाहतूक
व्यवस्था मजबूत करण्यासाठी ही भरती आवश्यक आहे. त्यासाठी चालक आणि वाहकांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाकडे
पाठविण्यात आला असून मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले. भविष्यात नियमित भरती
प्रक्रियेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना प्राधान्य देण्याचा विचार शासन करीत आहे.

एसटी महामंडळाकडून कंत्राटी पद्धतीने सुमारे १७ हजार ४५० चालक, वाहक व सहाय्यकांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून ती राज्यातील ६ प्रादेशिक विभागांनुसार केली जाण्याची शक्यता आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित संस्थांकडून एसटी महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध करून दिले जाईल.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सध्या रिक्त पदे भरण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये चालक (Driver), वाहक (Conductor), आणि यांत्रिक (Mechanical) लिपिक-टंकलेखक (Clerk) सहाय्यक (Helper) बस सफाई (Bus Cleaner) या पदांचा समावेश आहे.
रिक्त पदे: चालक, वाहक, यांत्रिक, लिपिक-टंकलेखक, सहाय्यक
| पद | शैक्षणिक पात्रता | इतर अटी |
|---|---|---|
| चालक | इयत्ता 10 वी उत्तीर्ण | अवजड वाहन चालक परवाना (Heavy License) आणि 1 वर्षाचा अनुभव. |
| वाहक | इयत्ता 10 वी उत्तीर्ण | वाहक परवाना / बिल्ला (Conductor License / Batch) आणि 1 वर्षाचा अनुभव. |
| यांत्रिक | इयत्ता १० वी उत्तीर्ण | ITI संबंधित क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान. |
| लिपिक-टंकलेखक | पदवीधर | मराठी टायपिंग (30 wpm) आणि इंग्रजी टायपिंग (40 wpm). |
| सहाय्यक | इयत्ता १० वी उत्तीर्ण | - |
या कंत्राटी भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सुमारे ३० हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.
निवड झालेल्या चालक व सहाय्यकांना एसटीकडून आवश्यक प्रशिक्षणही दिले जाणार आहे, जेणेकरून एसटी ची सेवा दर्जेदार व सुरक्षित राहील. या भरतीमुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
२०२२ च्या एसटी च्या ऐतिहासिक संपादरम्यान एसटीची सेवा निरंतर सुरु ठेवण्यासाठी ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली त्यांना या २०२६ च्या भरती प्रक्रियेत विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांनी केलेली सेवा आणि त्यांच्या कामाच्या अनुभवाचा विचार करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याकडे सरकारचा कल असल्याचे दिसून येत आहे. या भरती प्रक्रियेत सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्याने संधी देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सदर भरती ही कंत्राटी पद्धतीने होणार आहे. एकूण 3 वर्षांसाठी करार करण्यात येणार आहे. कंत्राटी भरतीसाठी निवड झालेल्या
तरुण-तरुणींना या 3 वर्षांत एसटी महामंडळाकडून संपूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना चालक, सहाय्यक या
पदावर नियुक्त केले जाणार आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी महामंडळात सध्या चालक व वाहकांच्या पदांवर मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत.
त्यामुळे चालक व वाचकांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील
वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी सदर भरती आवश्यक आहे. त्यासाठी चालक आणि वाहकांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाच्या वित्त
विभागाकडे पाठविण्यात आला असून मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

एसटी महामंडळाची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी दरवर्षी पाच हजार नवीन बस खरेदी करण्याचा प्रस्तावही सरकारकडून तयार करण्यात आला आहे. त्यापैकी तीन हजार बसांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून टाटा मोटर्सला सुमारे २१०० बस खरेदीचा आदेश देण्यात आला असल्याची माहितीही मंत्री सरनाईक यांनी दिली.
एसटी महामंडळाकडून 2 ऑक्टोबर रोजी या भरती प्रक्रियेसाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागनिहाय राबवण्यात येणार आहे. त्यानंतर सविस्तर भरती प्रक्रियेची वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच आमच्या ST Mahamandal Portal वर दिले जाईल. आणि त्यानंतर इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
नोट: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाल्यावर तुम्हाला अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती तुम्हाला देऊ.
नोट: अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाल्यावर अर्ज कसा भरावा, अर्जात कोणती माहिती भरायची याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देऊ.
| रा. प. पुणे विभागाची सर्व साधारण गुणवत्ता यादी. | Read Advertisement |
|---|---|
| रा. प. पुणे विभागाची निवड यादी | Read Advertisement |
| रा. प. पुणे विभागाची अतिरिक्त निवड यादी | Read Advertisement |
| जाहीरात क्र.२/२०१९ सरळसेवा भरती वर्ग-२ ( कनिष्ठ ) अधिकारी (दि.१५.०४.२०१९ पर्यंत मुदत वाढ) | Read Advertisement |
| जाहीरात क्र.१/२०१९ सरळसेवा भरती अधिकारी वर्ग-१ व वर्ग-२ पदे (दि.१५.०४.२०१९ पर्यंत मुदत वाढ) | Read Advertisement |
| जाहीरात क्र.०२/२०१९ -सरळसेवा भरती चालक तथा वाहक | Read Advertisement |
| जाहीरात क्र.०१/२०१९ -सरळसेवा भरती चालक तथा वाहक (दि.१५.०२.२०१९ पर्यंत मुदत वाढ) | Read Advertisement |
| सरळसेवा भरती अधिकारी वर्ग-१ (दि.२९.०९.२०१८ पर्यंत मुदत वाढ) | Read Advertisement |
| सेवानिवृत्त वर्ग -१ दर्जाच्या अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नेमणूक करण्याकरिता अर्ज मागविणेबाबत | Read Advertisement |
| संगणक पर्यवेक्षक पदाची परीक्षा. | Read Advertisement |
| दि. ०२.०७.२०१७ रोजी चालक तथा वाहक (क) पदाची लेखी परीक्षा | Read Advertisement |
| जाहिरात क्र. ०१/२०१७ सरळसेवा भरती पर्यवेक्षकीय पदे. | Read Advertisement |
| जाहिरात क्र. ०२/२०१७ सरळसेवा भरती घटकसंवर्ग पदे. | Read Advertisement |
| जाहिरात सरळसेवा भरती महाव्यवस्थापक पदे. | Read Advertisement |
| मुख्य कामगार अधिकारी हे पद करार पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात. | Read Advertisement |