Pune Bus Stand Contact Number - पुणे बस स्टँड फोन नंबर
खाली Pune Bus Stand Contact Number तसेच पुणे बस स्थानकाचा पत्ता, Pune Bus Stand Google Map Location तसेच बस स्थानकाचे
फोटो दिलेले आहेत. प्रवाशांना याचा नक्कीच उपयोग होईल.
Pune Bus Stand Phone Number
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे बस स्थानक
| Pune Bus Stand Contact Number |
020-24449980 020-24441591 020-24442860 020-25536970 020-26126218 |
| पुणे वाहतूक नियंत्रण केंद्र |
020-24442968 020-25827551 |
| MSRTC Helpline Number |
1800 22 1250 |
| Pune Bus Stand Address |
ST Stand, Shivajinagar Bus Stand Rd, Narveer Tanaji Wadi, Shivajinagar, Pune, Maharashtra 411005 |
| Pune Bus Depot Time Table |
येथे पहा |
प्रवाशांना उपयुक्त माहिती:
- ऑनलाईन तिकीट बुकिंग: महाराष्ट्र
राज्य मार्ग परिवहन महामंडळ अधिकृत पोर्टल
- एसटी बस तिकीट दर सवलत: बस दरातील सवलती
येथे तपासा
- तिकीट रद्द केल्यावर मिळणारा परतावा: येथे तपासा
- Pune Bus Stand Contact Number 020-24449980, 24441591, 24442860, 25536970, 26126218
- पुणे बस आगार संपर्क 020-24442968, 25827551
- MSRTC हेल्पलाईन क्रमांक: 1800 22 1250
- Pune Bus Stand Time Table PDF Download Download
- Pune Bus Stand Address:
ST Stand, Shivajinagar Bus Stand Rd,
Narveer Tanaji Wadi,
Shivajinagar,
Pune, Maharashtra 411005
पुणे एसटी स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वैशिष्टये
| बसचे नाव |
श्रेणी |
बस चे वैशिष्ट्य |
| लालपरी |
साधी बस (Ordinary) |
ग्रामीण भागासाठी |
| शिवनेरी |
आरामदायी (Volvo) |
आरामदायी आणि अत्यंत सुखद प्रवास |
| शिवशाही |
मध्यम-आरामदायी (AC) |
परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्यासाठी |
| शिवाई |
इलेक्ट्रिक |
प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणारी |
| विठाई |
भक्ती सेवा |
पंढरपूरच्या वारीसाठी किंवा धार्मिक स्थळांसाठी |
प्रवाशांना महत्त्वाची सूचना:
- एसटीच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी बस स्थानकात
गाड्यांच्या वेळापत्रकाची खात्री करावी
- गणपती, शिमगा, तसेच मे महिन्याच्या सुट्टीत जादा एसटी बसेस सोडल्या जातात.
- एसटीमध्ये एक व्यक्तीला 15 किलोपर्यंत सामान मोफत नेता येते परंतु सामान जास्त असेल तर सामान शुल्क
(Luggage Charges) भरावे लागू शकते.
पुणे बस आगारातील उपलब्ध सुविधा
- रा.प. बसचे वेळापत्रक
- सदर बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
- सदर बस स्थानकात उपाहारगृह उपलब्ध आहे.
- सदर बस स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
- बस ची वाट बघण्यासाठी प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध आहे.
- चौकशी कक्ष
- दुचाकी वाहन तळ
- जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे.(उदा. स्वच्छतागृह, पिण्याचे
पाणी, उपहार गृह, कर्मचाऱ्यांमार्फत गैरवर्तणूक इत्यादी)
- सुचना पुस्तिका
- चहा/शीतपेय दुकाने
- पुस्तक दुकान
- आरक्षण सुविधा
- वजन काटा
- सीसीटीव्ही
- व्हील चेअर
पुणे एसटी स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी खालील गोष्टींचा समावेश केलेला आहे. जेणेकरून प्रवास करताना
प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही.
वेळापत्रक फलक
यामध्ये तुम्हाला खालील माहिती मिळेल.
- गाड्या सुटण्याची वेळ: आगारातून बस सुटण्याचौ तसेच शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा
वेळ याची माहिती मिळेल.
- बस मार्ग: एखादी बस कुठल्या मार्गाने जाणार नाही.
- गाडीचा प्रकार: लालपरी, शिवशाही, विठाई, हिरकणी, शिवनेरी, स्लीपर आहे.
फलाट क्रमांक
- तुमची बस कुठल्या फलाट क्रमांकावर लागणार आहे याची माहिती दिलेली आहे. यामुळे शिवाच्या क्षणी
प्रवाशांची पळापळ होणार नाही.
चौकशी खिडकी
- जर तुम्हाला बस वेळापत्रकात काही समजले नाही तर तुम्ही चौकशी खिडकीवर जाऊन विचारू शकता.
- तुमची बस सध्या कुठे आहे हे तुमची विचारू शकता.
- तुमच्या गाडीला उशीर झाला असेल तर तुम्ही चौकशी खिडकीवर विचारू शकता.
- जादा गाड्या सोडल्या आहेत का हे विचारू शकता.
आरक्षण खिडकी
- लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही आरक्षण खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करू शकता.
- तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता किंवा त्याचे नूतनीकरण करू शकता.
- एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रवासी योजनांची माहिती मिळवू शकता. (उदा. महिला
सन्मान योजना, जेष्ठ नागरिक सवलत योजना इत्यादी)
डिजिटल स्क्रीन
- बस स्थानकात डिजिटल स्क्रीन आहे ज्यावर तुम्ही सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वेळ बघू शकता.
सूचना फलक
- एखाद्या मार्गावरचा रस्ता खराब असल्याने किंवा रस्त्याच्या कामामुळे बसचा मार्ग बदलला असल्यास
त्याची सूचना या सूचना फलकावर बघू शकता.
- एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती येथे बघू शकता.
- बस डेपो व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तुम्ही येथे बघू शकता.
पुणे बस स्थानक: फलाट आणि मार्ग
| फलाट क्रमांक |
प्रमुख मार्ग / ठिकाणे |
| 1 आणि 2 |
सातारा, कराड, सांगली, मिरज |
| 3 आणि 4 |
कोल्हापूर (विनावाहक आणि शिवनेरी) |
| 5 आणि 6 |
सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर |
| 7 |
भोर, नीरा, सासवड |
| 8 |
बारामती, इंदापूर |
| 9 आणि 10 |
महाबळेश्वर, वाई, पाचगणी |
| 11 आणि 12 |
रत्नागिरी, चिपळूण, कोकण मार्ग |
| 13 ते 15 |
मुंबई (दादर, ठाणे, बोरिवली - शिवनेरी/अश्वमेध) |